अखेर पाकिस्तान झुकले, कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला दिली भेटण्याची परवानगी – eNavakal
गुन्हे राजकीय विदेश

अखेर पाकिस्तान झुकले, कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला दिली भेटण्याची परवानगी

इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव प्रकरणात घेतलेली आडमुठी भूमिका पाकिस्तानने काहीशी मवाळ केली आहे. पाकिस्तानने कारागृहात बंद असलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी त्यांच्या पत्नीला दिली आहे. मानवतेच्या भावनेतून कुलभूषम जाधव यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या ४६ वर्षीय जाधव यांना मार्च २0१६ मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी १३ डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती.

दरम्यान, कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताने पेशावर आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला करण्या-या दहशतवाद्याला सोडण्यास तयार असून अदलाबदली करण्याची ऑफर दिल्याचा दावा या प्रकरणात भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानने सप्टेंबरमध्ये केला होता. मात्र भारताने पाकिस्तानचा खोटारेडपणा उघड केला होता.  ‘अफगाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली प्रेस रिलीज तुम्ही सर्वांनी पाहिली आहे. प्रेस रिलीज पाहिली तर पाकिस्तानने आपल्या लांबलचक यादीत अजून एक काल्पनिक खोटं जोडलं आहे. पाकिस्तानने अजून एक आपण स्वत: रचलेली स्टोरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगत पाकिस्तानचे पितळ उघडे केले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

मेकअप बॉक्स वाटल्याप्रकरणी प्रणिती शिंदेेंच्या अडचणीत वाढ

सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मेकअप बॉक्सचे वाटप केले असल्याचा आरोप...
Read More
post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More