अखेर कल्याण-डोंबिवली मनपातील शिवसेना-भाजपा युती तुटली – eNavakal
News महाराष्ट्र

अखेर कल्याण-डोंबिवली मनपातील शिवसेना-भाजपा युती तुटली

shivsena and bjp

कल्याण – शिवसेनेने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्याशी महाविकास आघाडी करून राज्याची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई पालिकेतील सेना-भाजपाची युती तुटली होती. आज अखेर कल्याण-डोेंबिवली महापालिकेतीलही सेना-भाजपाची युती तुटली आहे. आज भाजपाने कल्याण-डोेंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल दामले यांची नियुक्ती केली. दीड महिन्यापूर्वीच भाजपाने स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे आणि इतर अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेच्या गणेश काटे यांचा पराभव केला आणि विकास म्हात्रे यांना अध्यक्षपदी बसविले. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांवरून आरोप करत महापौर उपेक्षा भोईर यांनी राजीनामा दिला होता. त्याचवेळी भाजपाने खर्‍या अर्थाने शिवसेनेशी युती तोडली होती. आज भाजपाने रीतसर विरोधी पक्षनेते पद स्वीकारून सेनेशी युती तोडली. कल्याण-डोेंबिवली महानगरपालिकेत 122 नगरसेवक आहेत. त्यात शिवसेनेचे 53, भाजपाचे 43, मनसेचे 9, कॉँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 2, अपक्ष 9, बसपा 1 व एमआयएम 1 असे बलाबल आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More
post-image
महाराष्ट्र

घाटी रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचे स्क्रीनिंग सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. कोरोनाच्या 3...
Read More
post-image
देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांची प्रकृती खालावली, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लंडन – १० दिवसांपूर्वी बोरिस यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर नियमित चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात नेले असता प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात...
Read More