अखेर उल्हासनगरातील अतिधोकादायक लक्ष्मी नारायण इमारत पाडण्यास सुरुवात – eNavakal
News महाराष्ट्र

अखेर उल्हासनगरातील अतिधोकादायक लक्ष्मी नारायण इमारत पाडण्यास सुरुवात

उल्हासनगर- शहरातील अतिधोकादायक लक्ष्मीनारायण या इमारतीवर महानगरपालिकेने आधुनिक मशीनचा वापर करून तोडू कारवाई केली. आठवडाभरात अतिधोकादायक दोन इमारती जमीनदोस्त करणार आहे.

उल्हासनगर शहरात अतिधोकादायक 19 तर धोकादायक 151 अशा एकूण 170 इमारती उल्हासनगर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. त्यातच उल्हासनगर क्रमांक 3 उल्हासनगर रेल्वे स्टेशन रोड येथील पाच मजली लक्ष्मी नारायण या इमारतीचा काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून इमारत एका बाजूला झुकली होती. ती केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे मनपाने अखेर धोकादायक इमारत पाडण्यास सुरुवात केली असल्याचे साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगून खेमानी उल्हासनगर 3 येथील शांती व्हीला व गोल मैदान येथील शिवसागर या अतिधोकादायक इमारती आठवडाभरात जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 24 लाख खर्च येणार असल्याचे गणेश शिंपी यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सराफांच्या भिशीवर बंदी सरकारने अध्यादेश काढला

नवी दिल्ली- दाग-दागिने विकणार्‍या सराफांच्या भिशीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसा अध्यादेशच आज सरकारने काढला. या अध्यादेशान्वये सराफ चालवत असलेल्या अल्पबचत योजनेवर बंदी...
Read More
post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More