अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ३९वे अधिवेशनाला आजपासून सुरुवात – eNavakal
News मुंबई

अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ३९वे अधिवेशनाला आजपासून सुरुवात

मुंबई- वर्तमान परिस्थिती धर्मांध, जात्यांध व फॅसिस्ट प्रवृत्तींना उच्छाद मांडला. भारताच्या संविधानाला निकालात काढण्याचे प्रयत्न होत आहेत. न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेला संशयाच्या घेरात ओढले जात आहेत. याचे गांभीर्य विचारात घेऊन महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे 39 वे अधिवेशन आज आणि उद्या परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते  करण्यात आले
यावेळी सत्यशोधक आनंद स्वामी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे तसेच स्वागताध्यक्ष शेकापचे आमदार जयंत पाटील आहेत. तसेच प्रमुख संयोजक प्रा. एस. व्ही. जाधव, बाबा आढाव हे आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात 6 परिसंवाद होणार आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार राही भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More