अक्षय वांजळे ठरला ‘नंदू मराठे श्री’चा मानकरी – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

अक्षय वांजळे ठरला ‘नंदू मराठे श्री’चा मानकरी

पुणे – 50व्या आंतरमहाविद्यालयीन कै. नंदू मराठे शरीरसौष्ठव स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान अक्षय वांजळे याने पटकाविला. या स्पर्धेतील अन्य गटात प्रवीण गायकवाड, कौस्तुभ गव्हाणे, शिवप्रसाद परदेशी व मोहनीश अहिर यांनी विजेतेपद जिंकले.
बँक ऑफ महाराष्ट्र व ट्रु स्पेस प्रायोजित ही स्पर्धा आबासाहेब गरवारे महाविद्यालयात संपन्न झाल्या. या स्पर्धेत ३४ महाविद्यालयांतील 48 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील 80 किलोवरील वजनी गटात संस्कार मंदिर महाविद्यालयाच्या अक्षय वांजळे याने विजेतेपद पटकावीत कै. नंदू मराठे श्रीचा मान मिळविला. एमआयटीएमएसीएसचा दिव्यांक आरू हा उपविजेता, तर टीजे महाविद्यालयाच्या आकाश नाटेकरला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
अंतिम निकाल (प्रथम तीन विजेते)
60 किलो खालील : प्रवीण गायकवाड (आप्पासाहेब जेधे महाविद्यालय), अमित गायकवाड (टिमवी), श्रीराम पायगुडे (वायसीएम). 60 ते 65 किलो : कौस्तुभ गव्हाणे (एमआयटीएसओएम), रूपेश मोरे (मॉर्डन महाविद्यालय), आदित्य दासवेकर (आयएमसीसी). 65 ते 70 किलो : शिवप्रसाद परदेशी (आरसीएम महाविद्यालय), वैभव जाधव (सिंहगड महाविद्यालय), शुभम वाईकर (आंबेडकर महाविद्यालय). 70 ते 80 किलो : मोहनीश अहिर (नौरोसजी वाडिया), वसीम शेख (इंदिरा महाविद्यालय), अमित सकट (आबासाहेब गरवारे).

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More