अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील लूक पाहिलात का? – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील लूक पाहिलात का?

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटात अक्षयसोबत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहे.

राघवा लॉरेन्स यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ येत्या ५ जून 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार तृतीयपंथी भूताच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो डोळ्यात काजळ लावताना दिसत आहे. हा लूक पाहून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More