अक्षय्य तृतीया विशेष : सोन्यातील गुंतवणूक – eNavakal
अर्थ मुंबई लेख

अक्षय्य तृतीया विशेष : सोन्यातील गुंतवणूक

अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीचा उत्तम मुहूर्त मानतात. सोन्याने 32 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणार्‍यांचा उत्साह काहीसा कमी दिसेल. असे असले तरी अक्षय्य तृतीया गुंजभर का होईना आवर्जून सोने खरेदी करणारे लोक आहेत. दीर्घकाळात ही सवय फायदेशीर ठरते. अलीकडच्या काळात सोन्याच्या गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यांचाही विचार करता येईल. आज आपण सोन्याचा गुंतवणूक म्हणून विचार करूया. सोने गुंतवणुकीसाठी योग्य व अयोग्य काळ नसतो. पण गुंतवणूक ही नेहमी दीर्घावधीसाठी किमान पाच वर्षासाठी मात्र असावी. दीर्घ मुदतीत सोन्यातील परतावा 10 टक्क्यांपेक्षा अधिक नाही, पण सोने गुंतवणुकीच्या तुलनेत शेअर बाजारात जोखमीचा घटक मोठा आहे, हेही ध्यानात घ्यावे. त्यामुळे सोन्यात गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपण सोन्यात गुंतवणुकीचे सर्वसाधारण फायदे असे किती आहेत, ते पाहू. सोन्यांत पैसा टाकण्याची दोन साधीशी कारणे आहेत. एक म्हणजे सोन्यात गुंतलेला पैसा हा आपल्या बचतीचा घास घेणार्‍या महागाईपासून संरक्षित केला जातो. त्यामुळे सोन्यात मिळून परतावा हा त्या दरम्यानच्या काळातील वाढत गेलेल्या महागाई दराच्या बरोबरीनेच पण काहीसा वरचढ असेल. सोन्यात गुंतवणुकीचे आणखी एक कारण आहे. सोने गुंतवणुकीची वर्तणूक ही समभागांतील गुंतवणुकीच्या व्यस्त स्वरूपात असते. 2007 सालापासून शेअर गुंतवणुकीची कामगिरी चांगली राहिली नाही, त्याच काळात सोन्याला झळाळी चढली. म्हणून तुमच्या गुंतवणुकीत सोन्याचाही समावेश हवा.

सोन्यातील गुंतवणुकीची 2006 ते 2011 दरम्यान बहारदार कामगिरी राहिली आहे. या काळात सोन्याने प्रति वर्ष 29 टक्के दराने परतावा दिला आहे. हा परतावा दर त्या काळात अन्य कोणत्याही गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत निश्चितच सरस होता. आपला पारंपरिक कल हा सोन्याचे दागिने खरेदीकडेच असतो. प्रसंगी सोन्याची वळी, नाणी व चिपा खरेदी केल्या जातात. परंतु या पद्धतीच्या काही उणिवा आहेत. तुमच्या खरेदी मूल्यात घडणावळीचा खर्च समाविष्ट असतो. जो प्रसंगी खरेदी मूल्याच्या 15 टक्क्यांपर्यंत जाणारा असतो.

सोन्याची नाणी, वळी

ही ज्वेलरी स्टोअर्स, बँका किंवा ऑनलाईन पोर्टलवर विकत मिळतात. बँकांकडून तुम्ही जर ही विकत घेतलीत, तर बँक ती परत विकत घेत नाहीत, हे लक्षात घ्या. ती तुम्हाला अन्यत्र विकावी लागतात. बँकेकडे विक्रीसाठी 2, 4, 5, 8, 9, 10 ग्रॅमची नाणी व 20 व 50 गॅ्रमचे बार विक्रीस उपलब्ध आहेत. यांच्या किमतीही रोजच्या सोन्याच्या किमतीनुसार असतात व या बँकांच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात. हे खरेदी करताना शुद्धतेकडे लक्ष पुरवावयास हवे. याची विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा नेहमी कमी असते. दागिने खरेदीच्या तुलनेत सुवर्ण नाणी व वळी खरेदी करणे ही गुंतवणुकीची पद्धत निश्चितच चांगली. सोन्याची नाणी, वळी तुम्ही परिचयातील सराफाकडूनच करायला हवी. तुमच्या विश्वासातील सराफच तुम्ही जमा केलेली ही नाणी व वळी रूपातील सोने पुन्हा खरेदी करू शकेल.

गोल्ड ईटीएफ

गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ) हा एक प्रकारची म्युच्युअल फंड योजना आहे, जी सोन्यात गुंतवणूक करीत असते. गोल्ड ईटीएफच्या युनिट्सची शेअर बाजारात सूचिबद्धता व नियमित व्यवहार होत असतात. शेअर गुंतवणुकीप्रमाणे डिमॅट खाते उघडून तुम्हाला शेअर दलालामार्फतच या गोल्ड ईटीएफ योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल.
तुम्हाला सोने गुंतवणूक हवी आहे, पण ती अगदी अल्पतम स्वरूपात तुम्ही करू पाहात असाल तर गोल्ड म्युच्युअल फंड आदर्श पर्याय ठरतो. जर तुमच्या गुंतवणुकीचा निधी मोठा असेल तेव्हा तुम्ही शेअर दलालाकडे दलाली शुल्काबाबत वाटाघाटी करू शकता आणि अशा समयी गोल्ड ईटीएफ हा पर्याय तुम्हाला साजेसा ठरेल.

सोने गुंतवणूक किती?

एकूण गुंतवणूक भांडारात 5 टक्के ते 10 टक्के सोने गुंतवणुकीचा वाटा असावा. केवळ वैविध्य व जोखीम नियंत्रणासाठी हे प्रमाण पाळले जावे. यापेक्षा जास्त गुंतवणूक कराल, तर हे लक्षात असू द्यावे की, दीर्घ मुदतीत सोने गुंतवणुकीचा परतावा सरासरी वार्षकि 10 टक्क्यांपेक्षा जास्त राहिलेला नाही.

फंड ऑफ फंड्स

डिमॅट अकाऊंट नाही. मात्र सोन्यात गुंतवणूक करण्याची प्रचंड इच्छा आहे, अशांसाठी ‘फंड ऑफ फंड्स’ हा गुंतवणुकीचा आणखी एक प्रकार उपलब्ध आहे. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे साधन म्हणूनही या साधनाकडे पाहिले जाते. यात गुंतवणूक करण्यासाठी एक अर्ज भरून द्यावा लागतो. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करून परतावा मिळवून देणे हा या फंडचा उद्देश असतो. कोणत्याही ओपन एंडेड म्युच्युअल फंड योजनेप्रमाणेच हा फंड असतो. यात एकदाच गुंतवणूक करायची असल्यास किमान पाच हजार रुपये गुंतवावे लागतात. यात सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा (एसआयपी) वापर करून गुंतवणूक करता येऊ शकते. मात्र, महिन्याला किमान एक हजार रुपयांचा सहा महिन्यांचा एसआयपी करावा लागतो. तसेच यात सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅनची (एसटीपी) सुविधादेखील उपलब्ध आहे. तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक केल्यासारखा आभास यामुळे येतो. तसेच किमान एक ग्रॅमचे युनिट विकत घ्या, अशी सक्ती यात नसते. तुम्ही गुंतवणूक केल्यावर फंड मॅनेजर गोल्ड ईटीएफचे युनिट खरेदी करीत असतो. तुमच्या व्यवहाराचीे जबाबदारी तो पार पाडतो. रकमेची गरज भासल्यास यातून गुंतवणूक काढून घेणे सोपे आहे. गोल्ड ईटीएफचे व्यवहार अधिक दिसत असले तरी काही वेळा गोल्ड ईटीएफ अधिक किंवा कमी एनएव्ही मिळालेली आहे. उदाहरणार्थ, तुमच्याकडे गोल्ड ईटीएफचे एक हजार युनिट आहेत. तुम्हाला एकाच वेळी त्यांची विक्री करायची असेल तर तुम्हाला कदाचित कमी एनएव्ही मिळू शकते. तसेच अधिक युनिट खरेदीदारास कदाचित अधिक एनएव्ही पडू शकते. मात्र, ’फंड ऑफ फंडा’बाबत असे होत नाही. विक्री किंवा खरेदीच्या दिवसाच्या अखेरीस जी एनएव्ही असेल तीच एनएव्ही मिळते.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More