अकोले तालुक्यात विहिरीत आढळल्या १४ मोटारसायकली – eNavakal
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात विहिरीत आढळल्या १४ मोटारसायकली

अकोले – दोन विहिरीत तब्बल १४ हुन अधिक मोटारसायकली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना अकोले(जि.नगर) तालुक्यातील कळस येथे घडली. कळस येथील ग्रामस्थांच्या तब्बल नऊ तासांच्या अथक परिश्रमातून आणि पोलिसांच्या उपस्थितीत या मोटारसायकली दोर आणि लोखंडी तारांचे गळ टाकून विहिरीबाहेर काढण्यात आल्या. कळस येथील प्रवरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बाजूला या विहिरी आहेत. यापैकी ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीत १२ तर एका खाजगी मालकीच्या विहिरीत दोन अशा १४ मोटारसायकली विहिरीतून बाहेर काढण्यात आल्या. दरम्यान आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे काम सुरूच होते. काल शुक्रवारी एका विहिरीत दोन मोटारसायकली दिसत आहेत अशी माहिती अकोले पोलिसांना समजली त्यामुळे आज त्या काढण्यासाठी गेल्याने पोलिसांनी जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतही ग्रामस्थांच्या मदतीने दोराच्या सहाय्याने लोखंडी गळ टाकून पहिला तर एका मागून एक अशा १२ मोटारसायकली विहिरीबाहेर काढण्यात आल्या.
या घटनेचे वृत्त समजतात अकोले आणि संगमनेर तालुक्यातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यात ज्यांच्या मोटारसायकली या पूर्वी चोरीस गेल्या होत्या त्यांचीही तातडीची उपस्थिती होती. त्यातील अनेक जणांनी आपापल्या मोटारसायकली ओळखल्या. त्यावर उपस्थित पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्पुरत्या स्वरूपात गाड्यांच्या सीटवर संबंधित व्यक्तींची नावेही लिहून ठेवली. यातील बऱ्याच मोटारसायकली या दोन ते अडीच वर्षांपूर्वीच्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या मोटारसायकलीची स्थिती अत्यंत वाईट झाली असून कित्येक दिवस पाण्यात आणि गाळात रुतून बसल्याने त्यांचे लोखंडी भाग अक्षरशः सडून गेले आहेत. काही मोटरसायकलिंचे टायर, रिंगा काढून घेतलेल्या अवस्थेत आहेत तर काही मोटारसायकली अक्षरशः सांगाड्यांच्या अवस्थेत आढळून आल्या आहेत.
एका गाडीच्या पुढील बाजूस “पोलीस पाटील”असे लिहिलेले आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची ही जुनी वापरात नसलेली विहीर असून ती सुमारे ५२ फूट खोल आहे. त्यात २५ फुटापर्यंत पाणी असल्याची माहिती येथील नागरिक गोरख वाकचौरे यांनी दिली. तसेच या विहिरींचे कठडेही कमी उंचीचे आहेत. दरम्यान या घटनेचा पंचनामा करून या मोटारसायकली विहिरीत कोणी आणि का टाकल्या? याचाही शोध घेणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.
यापैकी बहुतांश मोटारसायकली या अकोले, संगमनेर तालुक्यातील असल्याचे पुढे येत आहे. आज सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांच्या मदतीने सुरू झालेले हे काम सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरूच होते. दरम्यान आज सायंकाळ पर्यंत पोलीस ठाण्यात याविषयी कोणत्याही स्वरूपाची नोंद करण्यात आली नव्हती. या विहिरीत अजूनही मोटारसायकली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोटारसायकली चोरी गेल्याची नोंद ज्या पोलीस ठाण्यात केली आहे त्याचा संदर्भ देऊन संबंधितांनी आपली मोटरसायकल ताब्यात घ्यावी असे आवाहन अकोले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More