अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या – eNavakal
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी १ लाख ३२ हजार रुपये रोख आणि ३ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल सफाईदारपणे चोरून चोरटे पसार झाले. अकोले शहरातील रायगड नगर, राजमाता जिजाऊ नगर, नवरंग कॉलनी, स्वामी विवेकानंद कॉलनी उपनगरातील शिवाजी बाबुराव चासकर, बंडू बाळासाहेब वाकचौरे, भास्कर भाऊराव गावंडे, नामदेव चिंधु सुकटे, सुनिल वसंतराव लकारे आणि प्रदीप विश्वासराव शेळके अशा सहा जणांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून दागिन्यांसह रोख ऐवज लांबविला.

हे सहा जण कुटुंबासह गावी गेले होते. याचा चोरट्यांनी अभ्यासपूर्ण पाहणी करून एकाच रात्री या चोऱ्या केल्या. विशेष म्हणजे शेजारी लागून घरे असताना सुद्धा कोणालाही याची चाहूल सुद्धा लागली नाही. हे चोरटे चांगलेच सराईत आणि निर्ढावलेले असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे घटनाग्रस्तांचे म्हणणे आहे. दरम्यान, चोरीचे वृत्त समजताच सकाळीच अकोले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी स्वतः तत्काळ घटना स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व माहिती घेतली. या परिसरात या अगोदर दीड दोन वर्षांपूर्वीची मोठ्या प्रमाणावर चोऱ्या झाल्या आहेत. मात्र पोलिसांना एकाही चोरीचा तपास लावता आला नाही. पोलिसांकडून चोरीचा,चोरट्यांचा गांभीर्याने तपासच होत नसेल तर पोलिसात तक्रार तरी का दाखल करायची अशी मानसिकता घटनाग्रस्त नागरिकांची झाल्याचे पहावयास मिळत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यापुढे आता या चोर्यांच्या घटनामुळे आवाहन निर्माण झाले असून निदान पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे तरी आता या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळतील अशी अशा अकोलकर ठेवून आहेत.दरम्यान नगर येथून शॉन पथक पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. अकोले पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे अकोले शहरात प्रचंड दहशत पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More