अकरा हजार कोटी खर्चून गाडीवाल्यांचे चांगभले – eNavakal
लेख संपादकीय

अकरा हजार कोटी खर्चून गाडीवाल्यांचे चांगभले

मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे यात काही शंका नाही, परंतु या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवताना सामान्य माणसाला दिलासा मिळणे अपेक्षित आहे. सरकारकडून श्रीमंतांचा किंवा गाडी घोड्यावाल्यांचा विचार होतो असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही.

मुंबईतला सामान्य माणूस ज्या उपनगरीय रेल्वेचा वापर करतो किंवा बेस्ट बसेसचा वापर करतो या सेवा सुधारण्याऐवजी नको त्या गोष्टींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होताना दिसते. आतादेखील सरकारने वांद्रा-वरळी या सागरी सेतूनंतर आता वर्सोवापर्यंत अकरा हजार कोटी रुपये खर्चून आणखी एक सागरी सेतू उभारायला मंजुरी दिली आहे. आता हे सागरी सेतू वापरणारे लोक कोण असतात, ज्यांच्याकडे स्वत:च्या गाड्या असतात आणि जे सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करणे टाळतात. अशा श्रीमंतांकरिता हा सगळा खटाटोप केला जातो आणि इकडे मात्र ज्या मुंबईतली निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या उपनगरीय रेल्वेचा वापर करते म्हणजे जवळपास सत्तर लाख लोक हे मध्य, पश्चिम, आणि हार्बर रेल्वेचा वापर करतात. तिथल्या सेवा सुधारण्याकरिता सरकारकडे पैसा उपलब्ध नसतो किंवा या उपनगरीय सेवांमध्ये वेगाने सुधारणाही होत नाही. आज तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर कितीतरी समस्या आहेत. त्याची एक भलीमोठी यादी तयार करता येऊ शकेल, परंतु या सेवांचा उपयोग केवळ सामान्य माणूस करतो, तो काही पैसेवाला नसतो आणि त्याने कितीही गैरसोयी सहन केल्या तरी चालू शकतात. अशा प्रकारची सामान्य माणसाविषयीची निर्ढावलेली भूमिका पाहायला मिळते. या तीनही रेल्वेमार्गांवर अफाट गर्दी आहे आणि या गर्दीमुळेच रोज सरासरी तीन ते सहा प्रवाशांचा मृत्यू होत असतो. वर्षाकाठी तीन ते चार हजार लोकांचे बळी घेणारी ही उपनगरीय सेवा युध्दपातळीवर कार्यक्षम करावी असे ना केंद्र सरकारला, ना राज्य सरकारला वाटते. पोटापाण्यासाठी किंवा रोजगारासाठी त्याला रोज प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यातल्या त्यात खिशाला परवडणारी ही उपनगरीय सेवाच त्याला उपयोगी पडत असते. त्याची ही गरज हाच एक नाईलाज झालेला आहे त्याच्या या गरजेपोटी मुंबईतल्या सामान्य माणसाला एकाअर्थी वेठीला धरले जाते.

उपनगरीय सेवा रखडलेलीच
यापूर्वी बांधला गेलेला वांद्रे-वरळी या सागरी सेतू ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यासाठी उपयोगी ठरला, परंतु या सागरी सेतूवरून चांगली बेस्टची सेवा उपलब्ध झाली आणि सामान्य माणसाला ती उपयोगाची ठरावी असे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. काही मोजक्या बसेस तिथून सोडल्या जातात. अनेक टॅक्सीचालक तिथल्या टोलमुळे सागरी सेतूवरून घेऊन जाणे टाळतात. याचा अर्थ मुंबईतल्या श्रीमंतांनी केलेल्या वाहनगर्दीला शरण जाऊन त्यांच्या मोटारींची वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता हा आता नव्याने अकरा हजार कोटींचा चुराडा केला जाणार आहे. यापेक्षा हे अकरा हजार कोटी उपनगरीय रेल्वे मार्गांसाठी वापरले असते तर ते जास्त योग्य ठरले असते. किंबहुना आज छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि ठाणे ते कल्याण या मार्गावरच्या पाचव्या मार्गिकांचे काम गेले दहा वर्षे रखडलेले आहे, तर इकडे विरार, डहाणू मार्गावरील चौथ्या मार्गिकेचे काम पैशाअभावी रखडलेले आहे. खरेतर पश्चिम किंवा मध्य उपनगरीय रेल्वेचा वापर सामान्य माणूसच अधिक प्रमाणात करतो आणि याच मार्गातून मेट्रोप्रमाणे उन्नत रेल्वेमार्ग उभे केले असते तर याच स्थानकांवर होणारी गर्दी अगदी सहजपणे विभागता आली असती. या प्रकल्पांकरिता चाळीस ते पन्नास हजार कोटीचा खर्च अपेक्षित होता. निम्मा खर्च केंद्राने केला असता आणि निम्मा राज्य सरकारने केला असते तरी हे प्रकल्प वेगाने आकाराला येऊ शकले असते. एकाचवेळी लाखो प्रवाशांची सोय झाली असती, परंतु सामान्य माणूस हा सरकारच्या खिजगणतीत नसतो किंवा प्रकल्प राबवताना त्याचा प्राधान्यक्रम श्रीमंतधार्जिणाच ठेवला जातो. म्हणूनच हे उपनगरीय रेल्वेसेवेचे प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळत ठेवले जातात. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या शहराची नेमकी गरजच ओळखली जात नाही. आणि म्हणूनच इथे शहरातल्या सामान्य माणसाला हद्दपार व्हावे लागते आणि बाहेरच्या श्रीमंतांना आलिशान घरदार बहाल केले जाते.

सटवीसारख्या समस्या
एकीकडे मुंबईतला मराठी टक्का कमी होत असल्याच्या तक्रारी करायच्या, पण दुसरीकडे याच मुंबईतल्या संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठी माणसाच्या मूलभूत समस्याच सोडवायच्या नाहीत किंवा बाहेरून येणार्‍या आणि आपल्या श्रीमंतीचा थाटमाट असणार्‍यांच्या गरजा पूर्ण करायच्या. यातलाच एक भाग म्हणून या नव्या सागरी सेतूकडे पाहावे लागते. खरेतर वाहतुक कोंडी दूर करण्याकरिता मुंबईची वाहतूक सेवा भक्कम केली पाहिजे. माणूस कितीही श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला तरी त्याला वेगवान आणि आरामदायी सागरी रेल्वे बससेवा उपलब्ध करून देणे हा अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. सरकारचे धोरणच विचित्र स्वरूपाचे असल्याने हजारो कोटींचे प्रकल्प घोषित केले म्हणजे आपण कसे विकासशील आहे हे दाखवण्याचे काम होते. प्रवास करणार्‍यांमध्ये सामान्य माणसाची संख्या जास्त असते. त्याच्या गरजाही तशा सामान्य स्वरूपाच्याच असतात, मात्र त्यासुध्दा अक्षम्यपणे दुर्लक्षित होतात. आता बुलेट ट्रेनही आकाराला येणार आहे. पुढच्या तीन वर्षांत दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होईल आणि असाच पन्नास हजार कोटींचा नागपूर-मुंबई हा समृध्दी मार्गही तयार होईल, मात्र उपनगरीय रेल्वेसेवा किंवा राज्यातील रस्त्यांची दुर्दशा ही पाचवीला पूजलेल्या सटवीप्रमाणे सामान्य माणसाला कायम छळत राहील, असेच म्हणावे लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

BSNLने प्रीपेड प्लानची उपलब्धता वाढवली

नवी दिल्ली – सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने आपल्या प्रीपेड प्लानच्या व्हाऊचरची उपलब्धता वाढवली आहे. या व्हाऊचर प्लानचे नाव Vasantham Gold आहे. या प्लानची...
Read More
post-image
देश

भारताने उचललेल्या पावलाचे जगभरातून कौतुक – पंतप्रधान

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोरोनाचं संकट वेळीच ओळखलं...
Read More
post-image
मनोरंजन

निर्माते करीम मोरानींची कन्या शजा हिला ‘कोरोना’

मुंबई – अभिनेता शाहरुख खानचे निकटवर्तीय असलेले प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्या मुलीला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. निर्माते करीम मोरानी यांची कन्या शजा...
Read More
post-image
देश राजकीय

तबलिगी जमातवर कारवाई करा, अमरसिंह यांची मागणी

नवी दिल्ली – देशभर लॉकडाऊन असतानाही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून तब्बल 17 राज्यांत कोरोना संसर्ग पसरवणाऱ्या तबलिगी जमातवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्यसभा खासदार...
Read More
post-image
महाराष्ट्र

इंटरनेट रेडिओ सुरू करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका

नवी मुंबई – कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध माध्यमांचा वापर केला असून आता यामध्ये इंटरनेट रेडिओ या...
Read More