अकरावीच्या जागा वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन – आदित्य ठाकरे – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण

अकरावीच्या जागा वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन – आदित्य ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल यंदा गतवर्षीच्या तुलनेत एकूण १२ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे काही पालकांकडून प्रवेशाबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली असून त्यांनी २०१९-२० या नवीन शैक्षणिक वर्षात एसएससाठी अंतर्गत गुण पद्धत सुरू करावी आणि यंदाच्या अकरावी प्रवेशात राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तुकडी वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी जागा वाढवण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या प्रत्रकार परिषदेत आदित्य यांनी कोणत्याही राजकीय प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळले सध्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्वात गंभीर असल्याचे म्हणत त्यांनी विधानसभेच्या जागांबाबत बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, खासगी बोर्डांच्या  मुलांना मिळालेल्या भरमसाठ गुणांमुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात अडचणी येतील, अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे. या मुलांच्या पाठीशी मी उभा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More