अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक आजपासून बंद – eNavakal
महाराष्ट्र

अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक आजपासून बंद

कोल्हापूर – कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांकडून केले जाणारे खासगी अभिषेक बंद करण्याचा निर्णय गेल्या मंगळवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून आतापासून देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य कोणत्याही पुजाऱ्यांना गरुड मंडपात अभिषेक करता येणार नाही.

अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात रोज अभिषेक विधी केला जातो. मंदिरात देवीच्या पूजेचा आठवडा असलेले पुजारी व देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य पुजारीदेखील येथे अभिषेक विधी करतात. यांतील काही पुजारी हे श्रीपूजकांकडे सेवेकरी म्हणून काम करतात, तर काही पुजारी बाहेरचे आहेत. अशा पुजाऱ्यांकडून भक्तांना देवीचा अभिषेक घडवून दिला जातो, परस्पर पावती केली जाते, भरमसाट दक्षिणा घेतली जाते, यातून भाविकांची लूट व फसवणूक होते, अशा तक्रारी समितीकडे आल्या आहेत. याची दखल घेत समितीने वार असणारे श्रीपूजक व देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य खासगी पुजाऱ्यांना अभिषेक करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणे, मंदिर परिसराचा विकास, गरजू रुग्णांसाठी लॅब, देवस्थानअंतर्गत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी वाटप, मंदिराच्या पाचही शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More