अंबानी कुटुंब होणाऱ्या जावयासह बाप्पाच्या चरणी – eNavakal
देश फोटो मुंबई

अंबानी कुटुंब होणाऱ्या जावयासह बाप्पाच्या चरणी

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा डिसेंबर महिन्यात पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. लग्न ठरल्यानंतर अंबानी कुटुंबाने रविवारी रात्री उशिरा होणारा जावई आनंद पिरामलसह मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

मुकेश अंबानी यांच्या एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत ठरलं आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल. लग्न ठरल्यानंतर अंबानी कुटुंबाने आनंद पिरामल मंदिरात बाप्पांचे दर्शन घेतले. सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी ईशा अंबानी, आनंद पिरामल, मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबान, आकाश अंबानीसह ईशा अंबानीचे होणारे सासरे अजय पिरामलही उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लग्न जुळत नाही म्हणून भावंडांची आत्महत्या

पुणे – खेड तालुक्यातील डेहणे गावामध्ये राहणाऱ्या बहिण-भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी औषध घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More