अंबरनाथ व उल्हासनगर शहराला मिळणार वाढीव पाणीपुरवठा – eNavakal
जीवनावश्यक महाराष्ट्र

अंबरनाथ व उल्हासनगर शहराला मिळणार वाढीव पाणीपुरवठा

उल्हासनगर – विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बारवी धरणातून अंबरनाथ शहराला 30 एमएलडी व उल्हासनगर शहराला 50 एमएलडी पाणीपुरवठा मिळण्याकरिता लक्षवेधीच्या माध्यमातून मागणी केली होती. त्याला उत्तर देताना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंजुरी दिली.

अंबरनाथ व उल्हासनगर या दोन्ही शहरांना होत असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने या दोन्ही शहरास वाढीव पाणीपुरवठा मंजूर होण्याकरिता आमदार डॉ. किणीकर सातत्याने पाठपुरावा करीत होते. याकरिता उद्योग मंत्री, जलसंपदा मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, जलसंपदा राज्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव यांच्या दालनात वारंवार बैठकाही घेण्यात आल्या होत्या. तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलनदेखील केले होते. वारंवार बैठका, शासनाकडे निवेदने देऊन ही पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागत नसल्याने आमदार डॉ. किणीकर यांनी लक्षवेधी सूचना विधानसभेत सादर केली होती. यावर उत्तर देताना अंबरनाथ व उल्हासनगर शहरामध्ये पाणीटंचाई असल्याचे मान्य करत जलसंपदा राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांनी मंजूरी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More