अंबरनाथच्या ब्रिटिशकालीन रेल्वे पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी – eNavakal
News महाराष्ट्र

अंबरनाथच्या ब्रिटिशकालीन रेल्वे पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी

अंबरनाथ- अंबरनाथ येथील ब्रिटिशकालीन रेल्वेच्या पादचारी पुलाची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा सीएसटीएमच्या हिमालय पादचारी पुलाच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती घडण्याची भीती भाजपाचे विभाग उपाध्यक्ष आणि पुणे रेल्वे बोर्डाचे सदस्य किसनराव तारमळे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई सीएसटीएम रेल्वे स्थानकाबाहेरील हिमालय पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली होती. त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ रेल्वे स्थानक प्रमुख विजय वानखेडे यांची आज भेट घेऊन लेखी निवेदन दिले, भगवान सासे यावेळी उपस्थित होते.
अंबरनाथ येथील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे, त्यामानाने रेल्वे प्रवासी संख्या सुद्धा वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेला रेल्वे पादचारी पूल जुना झाला आहे, याशिवाय अलीकडेच अंबरनाथला पूर्व आणि पश्चिम दिशेला दोन सरकते जिने देखील याच जुन्या पुलाला जोडण्यात आल्याने पुलावर अतिरिक्त भार पडला आहे, काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकात काही सुधारणा करण्यात आल्या, त्यावेळी जुन्या पादचारी पुलाची डागडुजी केली नाही, त्यामुळे अस्तित्वात असलेल्या जुन्या पादचारी पुलाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा नाईलाजाने रेल प्रशासनाविरोधात आंदोलन छेडावे लागेल असा इशारा स्थानकप्रमुख वानखेडे यांना दिलेल्या निवेदनात तारमळे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील आणि रेल्वेच्या डीआरएम यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More