#GokhaleBridgeCollapse अंधेरीत पुलाचा भाग ट्रकवर कोसळला, दोन जण जखमी – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

#GokhaleBridgeCollapse अंधेरीत पुलाचा भाग ट्रकवर कोसळला, दोन जण जखमी

मुंबई –  पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये पूलावरील दोन पादचारी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत ओव्हरहेड वायररही तुटल्या असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे ट्रॅकवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 7.35 वाजण्याच्या सुमारास गोखले पूल कोसळला.

पश्चिम रेल्वेवर सध्या चर्चगेटपासून माटुंग्यापर्यंत आणि बोरिवली ते विरारपर्यंतची रेल्वे वाहतूक सुरु आहे. अग्निशमन दल आणि पश्चिम रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. अंधेरीतील विलेपार्लेच्या दिशेकडील गोखले पुलावर हा प्रकार हा घडला असून हा पुल रेल्वेचा होता की महापालिकेचा हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत प्रवासी जखमी झाले का याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More