अंधेरीत दारु पिताना झालेल्या वादातून एका इसमाची हत्या – eNavakal
News मुंबई

अंधेरीत दारु पिताना झालेल्या वादातून एका इसमाची हत्या

मुंबई – दारु पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून फिरोज हमीद खान या 54 वर्षांच्या इसमाची त्याच्याच मित्राने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून काही तासांत पळून गेलेल्या आरोपी मित्राला अटक केली. अहमद इस्माईल मुजावर असे या आरोपी मित्राचे नाव असून याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत आहे. मृत आणि आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी सांगितले.
फिरोज खान हा अंधेरीतील महाकाली गुंफा रोड, रघुनाथ यादव चाळीत राहतो. अहमद हा त्याचा खास मित्र असून ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. रविवारी रात्री ते दोघेही याच परिसरात मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादानंतर अहमदने फिरोजवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या घटनेनंतर अहमद हा तेथून पळून गेला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More