अंदमान-निकोबारला भूकंपाचे धक्के; २ तासांत ९ धक्के – eNavakal
देश

अंदमान-निकोबारला भूकंपाचे धक्के; २ तासांत ९ धक्के

पोर्टब्लेअर – भूकंप प्रवणक्षेत्र अशी ओळख असलेलेल्या अंदमान-निकोबार बेटांवर आज, पहाटे भूकंपाचे धक्के बसले. सुमारे दोन तासांच्या कालावधीत मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे तब्बल नऊ धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 आणि 5.2 एवढी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.

बेट भागात भूकंपाचा पहिला धक्का पहाटे 5 वाजून 14 मिनिटांनी बसला. त्याची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर एकामागून एक असे एकूण 9 धक्के बसले. भूकंपाचा शेवटचा धक्का सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी जाणवला. त्याच्या तीव्रतेची 5.2 इतकी नोंद झाली.

या परिसरात एकाच दिवसात भूकंपाचे दोन ते तीन धक्के बसणे नित्याचेच आहे. याआधीही येथे एकामागून एक असे अनेक भूकंपाचे धक्के बसले आहेत. आजही सुमारे दोन तासांत 9 धक्के जाणवले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More