अंत्यविधीसाठी निघालेल्या जवानांच्या गाडीचा अपघात – eNavakal
अपघात महाराष्ट्र

अंत्यविधीसाठी निघालेल्या जवानांच्या गाडीचा अपघात

बीड – बीड परळी हायवेवरील दिंद्रुड येथुन हाकेच्या अंतरावर संगम स्टेजवर परळीकडे जाणार्या भारतीय लष्कराच्या गाडीला आज दुपारी दिड वाजता अपघात झाला.  शहिद जवान मुरलीधर शिंदे यांचा परळी येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमास अहमदनगरहुन भारतीय लष्कराच्या 15 जवानांची तुकडी मानवंदना देण्यासाठी निघाली होती. दिंद्रुडच्या जवळ बीड परळी हायवेवर सदर जवानांच्या टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पलटी होण्याची घटना घडली असुन यात पायाला जखम होऊन दोन गंभीर तर सात किरकोळ जखमी झाले असल्याचे दिंद्रुड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सय्यद असिफ यांनी सांगितले.जखमींना तात्काळ मिळेल त्या वाहनाने बीड व माजलगांव येथिल शासकीय रुग्णालयात पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. दिंद्रुड पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटना स्थळावर दाखल झाल्याने मोठी हानी टळली. संगम,दिंद्रुड,भोपा ग्रामस्थांचे दिंद्रुड पोलिसांना मोठे सहकार्य मिळाल्याने गाडीत अडकलेल्या जवानांना तात्काळ बाहेर काढण्यात यश आले.दरम्यान क्रेन घटनास्थळावर दाखल झाले असुन रस्ता सुरुळीत   करण्यासाठी टेंम्पो रस्त्यावरुन हटवण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More