अंडरपाससाठी खोदलेल्या खड्ड्यात तीन मुलींचा बुडून मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अंडरपाससाठी खोदलेल्या खड्ड्यात तीन मुलींचा बुडून मृत्यू

पनवेल – नविन पनवेलमध्ये पंचशील नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेमार्गाच्या खालून अंडरपासच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पनवेलहून नविन पनवेलकडे जाण्यासाठी अंडरपासच्या बांधकामासाठी खड्डा खोदला जात आहे, त्या खड्ड्यात पोहण्यासाठी पंचशील नगर परिसरात राहणाऱ्या तीन मुली गेल्या असता खड्डयाचा अंदाज न समजल्याने हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. रेशम भोसले (वय १३), रोहिता भोसले (वय १०) व प्रतीक्षा भोसले (वय ८) अशी मृत मुलींची नावे आहेत. या तिन्ही मुली मुळच्या आमरावतीच्या आहेत, कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी त्या मुंबईमध्ये आल्याची माहिती खांदेश्वर पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एकंदरित रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या तिघींचा मृत्यू झाल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More