अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू – eNavakal
महाराष्ट्र

अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर – तालुक्यातील खराडी येथे वादळी पावसात अंगावर वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाळासाहेब निवृत्ती साबळे (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

खराडी (ता. संगमनेर) येथे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, शेतकरी बाळासाहेब साबळे व त्यांच्या पत्नी सुशीलाबाई साबळे या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणार्‍या काळेपाणी शिवारात कांद्याची पोळ झाकण्यासाठी गेले होते. त्याठिकाणीच बाळासाहेब साबळे यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मात्र बचावल्या. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने खराडी गावावर शोककळा पसरली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More