अंगावरून ट्रेन गेल्यानंतरही वाचला युवकाचा जिव सुखरुप – eNavakal
अपघात मुंबई

अंगावरून ट्रेन गेल्यानंतरही वाचला युवकाचा जिव सुखरुप

मुंबई- रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र कुर्ल्यात अजब घटना घडली. ही घटना आत्महत्येचा प्रयत्न फसल्याची होती. आत्महत्येसाठी रुळावर झोपला, मात्र पूर्ण ट्रेन अंगावरुन जाऊनही साधं खरचटलंही नाही. काल रविवार असल्यामुळे कुर्ला स्टेशनवर तुलनेने कमी गर्दी होती. सर्व प्रवासी आपआपल्या कामात व्यस्त होते. तितक्यात दुपारी चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर पाचवर एक एक्स्प्रेस ट्रेन आली.

त्यावेळी आत्महत्येच्या उद्देशाने एक व्यक्ती थेट त्या ट्रेनच्या समोर ट्रॅकवर झोपला. क्षणार्धात ट्रेन त्याच्या अंगावरुन पास झाली. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांचं लक्ष त्या व्यक्तीकडे एकवटलं होतं. ती व्यक्ती रेल्वेखाली चिरडली असणार असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र ट्रेन पास झाल्यानंतर ती व्यक्ती उठून उभी राहिली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

दरम्यान, या सर्वप्रकारानंतर आरपीएफ जवानांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. विश्वास गुलाब बनसोडे असं या व्यक्तीचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे विश्वास स्वत: रेल्वे कर्मचारी आहे. ते इगतपुरी इथं इलेक्ट्रिकल मेंटनन्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलं नाही.  आरपीएफच्या जवानांनी विश्वास यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत वाढले कोरोनाचे 4 हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचे घरही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 690 वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 450 झाली आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचे चार हॉटस्पॉट...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे घरातला एसी बंद असतो? मग थंडाव्यासाठी करा ‘हे’ उपाय

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना थंड वातावरणात झपाट्याने पसरतो त्यामुळे घरातील, कार्यालयातील एअर कंडिश्नर बंद ठेवण्याच्या सूचना वारंवार केल्या...
Read More
post-image
देश

बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी

तिरुअनंतपुरम – बलात्कार पीडितेला २४ आठ‌वड्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी केरळमधील उच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. एका १४ वर्षीय...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

लढा लवकर संपवूया, संशयितांनो पुढे या- अजित पवार

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. रोज तिप्पटीने बदलणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण करतेय. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा संपवायचा असेल तर संशयितांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More