अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटीची सक्ती नाही- निवडणुक आयोग – eNavakal
News न्यायालय मुंबई

अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटीची सक्ती नाही- निवडणुक आयोग

मुंबई- अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटी सक्तीची नाही. निवडणुकीच्या कामासाठी न येणार्‍या या अंगणवाडी कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे केंद्रीय आयोगाने आज मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले. आयोगाच्या या भुमिकेमुळे निवडणुक कामाला जुंपण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांना मोठा दिलास मिळाला आहे.
लोकसभेच्या निवडणूकीत प्रथमच अंगणवाडी सेविकांना निवडणुकीचे काम देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या उपाध्यक्षा संगीता चाचले आणि सचिव चेतना सुर्वे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम.एस. संकलेचा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी निवडणूक ड्यूटीलाच जारेदार आक्षेप घेतला होता. केंद्र सरकारने 2010 मध्ये एका परीपत्रकाद्वारे विशेष जबाबदारी असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने सीबीआयसह इतर काही विशेष सेवांसह अंगणवाडी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच अंगणवाडी सेविकांची जबाबदारी सेवार्थ आहे. त्यांच्यावर लहान कुपोषित बालकांच्या आहाराची, शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यात अनेक कामे समाविष्ट असल्याने त्यांच्यावर इतर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी टाकू नये. असे स्पष्ट निर्देशच निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2019 च्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलेले असताना अंगणवाडी सेविकांना निवडणूक कामाला जुंपणे बेकायदा आहे असा दावा केला होता. मात्र आयोगाने सुरूवातीला निवडणुक आयोगाची नियमावली बंधनकारक नाही, अशी भुमीका घेतली होती. अखेर आज न्यायालयात या अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटीची सक्ती नाही, असे स्पष्ट केले. ड्यूटी न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही, असे स्पष्ट केले. उभय पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निवडणुक आयोगाची नियमावली बंधनकार नसल्याचे उद्या प्रतिज्ञापत्रावर सांगा असे निर्दश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More