अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ – पंतप्रधान मोदी – eNavakal
News देश

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे वाढीव मानधन पुढील महिन्यापासून अंगणवाडी कर्मचार्‍यांना लागू होणार आहे. याचा लाभ 14 लाख अंगणवाडी कर्मचार्‍यांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांशी ‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’द्वारे संवाद साधला. त्यावेळी ही घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या कार्याने अंगणवाडीची आणि स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या देशातील अंगणवाडी सेविका, आशा आणि एनएनएम व प्रमुख सेविकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी कौतुक करताना त्यांचे प्रश्नही जाणून घेतले. देशाचा पंतप्रधान सांगू शकतो की त्याचे लाखो हात आहेत आणि ते हाथ म्हणजे तुम्ही, अशा शब्दांत मोदींनी अंगणवाडी सेविकांच्या कामांचे कौतुक केले.
मोदी म्हणाले, ज्या अंगणवाडी कार्यकर्ता, आशा वर्कर यांचे मानधन 2250 रुपये आहे, त्यांना आता 3500 रुपये देण्यात येईल. तर अंगणवाडी सेविकांना 1500 रुपयांऐवजी 2250 रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या अंगणवाडी सेविकांना सध्या 3000 रुपये मानधन मिळते, त्यांना 4500 रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले. दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून हे वाढीव मानधन लागू करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More